Close
Tanman in collaboration with Intrernational Academy of Ayurveda
+91-8432554545
tanmanayurved@gmail.com

Tanman in collaboration with International Academy of Ayurveda

मानसआरोग्य

या वर्षाच जागतिक आरोग्य संघटनेचं घोषवाक्य आहे “डिप्रेशन-let us talk” यावरून लक्षात  येईल कि मानस आरोग्य किती महत्त्वाच आहे. भारतात मानसिक व्याधीने ग्रस्त रुग्णांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ५% आहे   म्हणजेच हि समस्या आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी अधिक भिषण आहे  कारण हि नोंद झालेल्या रुग्णांची संख्या आहे याशिवाय नोंद न झालेले,लक्ष न दिलेले, आपली मानसिक स्थिती योग्य नाही हे मान्य न करणारे कितीतरी अधिक रुग्ण आहेत.आज आपण पाहतो अगदी लहानपणापासून प्रचंड स्ट्रेस वाढला आहे. nursery किंवा पहिलीला  प्रवेश घ्यायचा तरी तुम्हाला स्पर्धक आहेत त्यात तुम्हाला स्वतःला सिद्ध करायच आहे, मग प्रत्येक level ला तुम्हाला रोज सिद्ध करायच आहे स्पर्धेत टिकायचं आहे मार्क्स कसे पैकीच्या पैकीच हवेत फार झालेतर ९० च्या पुढे तर हवेतच तरच तुमचं काही तरी बऱ्यापैकी carrier होऊ शकते.असा पालकांचा, मुलांचा,शिक्षकांचा ठाम विश्वास आहे.आणि हे जमलं नाही कि हि overprotected मुलं आता सगळं जग हरवल्या सारख सारच काही संपल्यासारखी प्रचंड मोठ्या नैराश्याच्या गर्तेत ढकलली  जातात.खरंच  जीवन चांगलं, यशस्वी, आनंदी  जगण्यासाठी हेच आवश्यक आहे का ? फार स्पर्धेत उतरलेली, पूर्ण वेळ अभ्यास करणारी, खूप मोठा package घेणारी, मानाची नोकरी मिळवणारी सगळीच मुलं आयुष्यातही यशस्वी आहेत का? जीवनात होणाऱ्या इतर अनानुकूल  समस्येला यशस्वी तोंड द्यायला सक्षम आहेत का, कि सगळीकडे यश मिळाल्याने ते थोडंही अपयश पचवायला असमर्थ ठरली आहेत आणि छोट्याश्या दुःखाने खचून  जाताहेत  आणि मानसिक समस्येचे बळी ठरत आहेत.

का असं होत असावं? म्हटलं तर आज सर्व सुख होत जोडून उभे आहेत, तोंडातून शब्द काढायचा अवकाश कि सारं काही हजर आहे  इंटरनेट वर ऑर्डर केली कि कुठे जायला नको हव ते हजर! मग चुकतंय कुठे.? या सर्व गदारोळात मनाचं पोषण होत नाहीये का? का मनोविकार वाढू लागलेत? हळू हळू आपण virtual जगात जास्त रमू लागलोय हे virtual  जग फार सुंदर आहे आकर्षक आहे बर प्रत्यक्ष करायच काहीच नाहीये गोष्टीतल्या परीसारखा राजमहालासारखा सारच सुंदर छान छान  बोलायचं, लिहायचं, वाचायचं, मोठे मोठे फुलाचे गुच्छ केक्स इकडून तिकडे पाठवायचे virtual गाडी चालवायची बोटानी गेम्स खेळायचे, T .V वरचे कार्यक्रम पाहायचे. अगदी पहा तुम्ही लहान एकटेच मुलं आई बाबा दोघं १०-१० तास काम करणारे गलेलठ्ठ पगार असणारे, आणि ते मुलं कामवाली बाई किंवा पाळणाघरावर विसंबून वाढणार, बरं चोकोनी कुटुंबात,सॉरी हल्ली त्रिकोणी कुटुंबात चौथ्या व्यक्तीला प्रवेश नाही त्या मुलाची लहान वयापासूनच अडजस्टमेन्टला सुरुवात होते ते संवाद विसरतात, आई बाबा कामावरून आल्यावर थकलेले, मुलं जेवला का झोपला का, विचारल की कर्तव्य पूर्ण झाले!! मान मोडेपर्यंत दिवसभर काम केलेले, ते तरी मुलाला काय न्याय देणार! मुलाला ती सवयच होते एकटा राहण्याची  प्रत्येक भौतिक गोष्ट लगेचच मिळण्याची आणि त्यातच सुख शोधण्याची!-हळू हळू तेच आवडायलाही लागत यातच संवाद कुठे तरी हरवतो ,आई वडिलांनाही अपेक्षा असते याला जे हवा ते मी देतोय म्हणजे याने भरपूर अभ्यास करून भरपूर मार्क मिळवून तथाकथित यशस्वी झालच पाहिजे  यात त्याची आवड, कल, मर्यादा याचा सोयिस्करच विसर पडतो आणि उरते ती फक्त जीवघेणी स्पर्धा, हि स्पर्धा एवढी वाईट असते खूप यश मिळाल तरी जवळचे जिवाभावाचे मित्र उरत नाही , व्यावसायिक अभ्यासक्रमात तुम्ही पहा खरंच मित्र असतात? आपली कमतरता कुणीही कबुल करू शकत नाही घुसमट होते स्वतःचच स्वतःशी युद्ध सुरु होता आणि यातून येत ते एकाकी पण ! म्हणून संवाद महत्वाचा! W H O  ला हि तेच सुचवायचं संवाद महत्त्वाचा एकटेपण टाळायचं, depression  टाळायचं तर बोला, स्वतःशी बोला जवळच्यांशी बोला- मन मोकळं करा बोलते व्हा.यशस्वी व्हा, ध्येयाकडे लक्ष द्या पण जीवघेणी स्पर्धा टाळा!!मन मोकळं करा बोलते व्हा आई-वडिलांनी मुलासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा म्हणजे वेळ काढला पाहिजे, त्याचा / तिचा कल समजून घेऊन योग्य ते क्षेत्र निवडलं पाहिजे कुठलंही क्षेत्र वाईट नाही पण तुम्ही ज्या क्षेत्रात जाल ते तुमच्या आवडीचं असणं महत्त्वाचा तरच त्यात तुम्ही काहीतरी भरीव कामगिरी करू शकता नेत्रदीपक यश मिळवू शकता.नावडत काम आयुष्यभर करावं लागण यासारखी दुसरी शिक्षा ती काय? तुम्ही तुमच्या लाड्क्याला आयुष्यभर अशी शिक्षा देणार आहेत का, केवळ तुम्हाला समाजात प्रौढी मिरवता यावी म्हणून? न आवडत काम उगाच करायचं म्हणून केल जात त्यात प्रगतीही बेताचीच होते साहजिकच जमत नाही म्हणून नैराश्य ! प्रगती होत नाही म्हणून नैराश्य!! इतरांच्या याला हेही जमत नाही म्हणून बघणाऱ्या नजरामुळे आलेलं नैराश्य!!!–आणि हे कशासाठी तर जे आपण सहज टाळू शकणार होतो वडिलधाऱ्यांशी, मित्राशी, किंवा काही वेळा स्वतःशीच बोलून कि मला काय हवय मला नक्की काय आवडत ,त्यातच मी आनंदाने कष्ट, प्रगती करू शकतो.एवढं नक्की कि प्रत्येक व्यक्तीत  काही तरी विशेष करण्याची क्षमता असते गरज असते ती ते ओळखण्याची! व योग्य वेळी निर्णय घेऊन त्या मार्गाने जाण्याची !! मग कसलं डिप्रेशन आणि कसले मानस विकार जग जिंकण्याची क्षमता तुमच्यात असतांना कुठलेही नैराश्य तुमच्याकडे फिरकणार नाही छान  आनंदी समाधानी स्वछंदी जगा! हसत राहा बोलत राहा जेव्हा तुम्हाला उदास वाटत, खचल्या सारखं वाटत तेव्हा तुम्ही ज्यांना जवळच  समजता त्यांच्याशी बोला काही तरी आपल्यासाठी चांगला  मार्ग नेहमी असतो फक्त कधी कधी तो दाखवणारा वाटाड्या आवश्यक असतो.म्हणून बोला, share  करा  फक्त चांगले  फोटो, video विचार व्हाट्सअप किंवा फेसबुक, इंस्टाग्रामला नाही प्रत्यक्ष, वास्तविक जगात, तिथे तुम्ही मनातलं बोलू शकता virtual  जगात  सगळंच गोड गोड असते म्हणून share करा-बोला.

या बरोबरच आणखी आवश्यक म्हणजे आपल्या वैयक्तिक गरज कमी करा भौतिक सुखावर आपलं सुख अवलंबून ठेऊ नका म्हणजे आपोआपच आपल्याला एकमेकांसाठी वेळ मिळेल, व एकमेकांना ऐकता येईल .

मनाच्या पोषणासाठी आहारही तेवढाच महत्त्वाचा!! चांगला, सात्विक आहाराचं महत्त्व कायमच आहे, जेवण नेहमी ताज बनवलेल, घरगुती बनवलेल असावं. आईने बनवलेल्या जेवणाची सर तुमच्या रुक्ष पिझ्झा बर्गर ला कशी यायची, गरमागरम वाफाळलेला गुरगुट्या भात मेतकूट साजूक तुपाची सर नूडल्स सिझ्झलरला येईल का? कधीतरी बदल म्हणून या पदार्थांची चव चाखायला हरकत नाही  परंतु रोजच जेवण मात्र शुद्ध सात्विक घरी बनवलेला, ताजे, खूप तिखट – मसाला नसलेले, चौरस, भाजी,पोळी,वरण, भात,भाकरी, असेच असावे.मनुका,खडीसाखर,दूध,तूप,लोणी,चारोळी,अक्रोड,बदाम, हे पदार्थ आहारात असावे.ताजी फळ सिझनल फळ, अवश्य खावी. तळलेले पदार्थ,हॉटेलचे पदार्थ,कांदा लसूण युक्त , पदार्थ चहा, कॉफ़ी सारखी उत्तेजक पेय,पुन्हा पुन्हा सेवन केल्याने शरीरात रजोगुण वाढल्याने मन अस्थिर होते.खूप कोरडे पदार्थ, फ्रोझन फूड, डबाबंद अन्न, जळलेले,पदार्थ,अतिशिजवलेल अन्न, खारट पदार्थ, शिळे,बेचव,अति गोडं, जड अन्न  मनाचाही जडपणा वाढवतो,तमोगुण वाढवत, व मन नवीन विषय ग्रहण करायला असमर्थ ठरते म्हणून सात्विक अन्नचा मनाच्या पोषणात मोठा भाग आहे, चांगलं अन्न पाहिल्यावर मनही कस प्रसन्न  होतं!!

चांगल्या आहाराबरोबरच चांगल्या सवयीही प्रसन्न मनासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.नेहमी असा वागावं ज्यामुळे दुसऱ्याला क्लेश, दुःख होणार नाही,व आपल्या मनालाही वाईट वागण्याची, बोलण्याची टोचणी राहणार नाही.नेहमी चांगले विचार करावा, काहीतरी creative करायचा  विचार करावा,टोकाचे विचार,प्रतिक्रिया टाळावी, धोंडा वेळ शांत राहिलो कि आपोआपच विपरीत परिस्थितीतून  योग्य मार्ग सापडतो  , आक्रस्ताळी न वागत! हेवे-दावे टाळावे,प्राप्त परिस्थितीत समाधानी राहिल्यास खूप प्रश्न आपोआप सुटतात.

 सकाळी लवकर उठून व्यायाम करणे हि देखील अशीच चांगली सवय! वेगविधारण न करणे म्हणजे शरीराचे नैसर्गिकरित्या जे वेग येतात,मल- मूत्र विसर्जन,भूक-तहान याची वेळेवर काळजी घ्यावी म्हणजे वातविकार वाढल्याने रजोगुण वाढल्याने होऊ शकणारे मानस विकार होत नाही.याबरोबरच प्राणायाम, योगासन, योग्य व्यायाम याचाही मन प्रसन्न ठेवण्यास,प्रसंगी ताळ्यावर आणायला नक्की उपयोग होतो.

याबरोबरच आवश्यकता असल्यास आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शिरोधारा, बस्ती,नस्य यासारखे पंचकर्म व औषधी तूप,काढे याचा योग्य उपयोग नक्कीच तुमचं हरवलेला मन जागेवर आणायला मदत करेल.

म्हणून मनाकडे लक्ष द्या! मन करा  रे प्रसन्न!!

हे मन चंचलच आहे बहिणाबाईंनी म्हटलंच आहे मन वढाय वढाय आता होत भुईवर मग गेलं आकाशात!!”

त्याला एकाकी न सोडता कुठल्यातरी विधायक कामात गुंतवा आणि बोलत रहा-बोलते व्हा!!

वैद्य.नीलिमा शिसोदे

M .D कायचिकित्सा

Add Comment

Your email address will not be published. Required fields are marked *